Gold Rate Today : सोन्याच्या दरात तब्बल 1200 रूपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर सोने दरातील घसरण पहायला मिळाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत तब्बल 1,200 रुपयांची घसरण झालीय. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरामध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं आढळलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कामध्ये 2.5 टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर बाजारात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेती करू इच्छिणार्‍या ग्राहकांत आनंदाचं वातावरण आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2021:  जाणून घ्या, काय झालं स्वस्त? काय महाग?

आज सोमवारी दुपारी 1 वाजता सोन्याच्या दरामध्ये सुमारे 1,286 रुपयांची घट झालीय. सोन्याचा भाव 1,286 रुपयांच्या घसरणीसह 48,123 रुपये इतका नोंदविला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाली असून एक किलोग्रम चांदीचा भाव सध्या 72,870 रुपये इतका झालाय.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. एका वेबसाइटच्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या सोन्याच्या दरामध्ये 274 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होती. सकाळी 9.05 मिनिटांनी 185 रुपयांच्या वाढीसह सोन्याचा भाव 49,281 रुपये एवढा होता. तर चांदीचा दरही 1944 रुपयांच्या वाढीसह 71,650 रुपये इतका नोंदविला होता.

सोन्यावर 15 टक्क्यांहून अधिक कर!

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचा दरामध्ये कमालीची घसरण झालीय. पण, सध्या सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटी अधिक असल्याचं एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितलं आहे. सध्या सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी 12.5 टक्के इतकी आहे. तसेच याशिवाय त्यावर 3 टक्के जीएसटी हि आकारला जातो.