सलग दुसर्‍या दिवशी सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानंतर आज देशांतर्गत बाजारात देखील सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. आज दिल्ली सराफ बाजारात सोनं 70 रुपयांनी महागलं तर चांदी 147 रुपयांनी महागली.

सोन्याचे दर –
शुक्रवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत 70 रुपयांनी वाढ झाली त्यामुळे आज सोनं 41,481 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी सोने 266 रुपयांनी महागले होते.

चांदीचे दर –
चांदीच्या किंमतीत आज 147 रुपयांनी वाढ झाली. आज चांदी 47,036 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. गुरुवारी चांदीचे दर 46,889 रुपये प्रति किलोग्रॅम होते.

काय आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील दर –
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचा उद्योग स्थिरावलेला दिसला. शुक्रवारी सोन्याचे आंतरराष्ट्रीय दर 1,575.80 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.69 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

रुपया गडगडल्याने वाढल्या किंमती –
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सोन्या चांदीच्या किंमतीत तेजी आली. ते म्हणाले की आज डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी गडगडून 71.33 डॉलरच्या स्तरावर पोहचला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग स्थिर झाल्याने सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाली.