खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या भारतीय बाजारामध्ये सोन्याचांदीच्या (Gold, Silver Price Today) किंमती कमी झाल्या आहेत. तर सोने खरेदी करणाऱ्यासाठी एक खुशखबर आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जे सोनं खरेदी करणार आहे. त्या दिवशी ग्राहकांना सोनं स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. आज सोन्याचांदीच्या किंमती घसरल्या आहेत. MCX नुसार आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर सोन्याचा भाव ०.७ टाक्यांनी टक्क्याने कमी होऊन प्रति तोळा ४७,९१८ रुपये झाले आहे. तसेच चांदीचा भाव ०.२५ टक्क्याने घसरून प्रति किलो प्रमाणे ७१,३६४ रुपये झाला आहे.

सोन्याचा भाव आज देखील रेकॉर्ड स्तरावरून खूप कमी आहेत. तर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता शक्यता आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव प्रति टोला ५६,२०० इतक्या स्तरावर पोहोचले होते. लग्नसराईच्या कालावधीत सोन्याचा भाव ५२००० रुपये प्रति तोळावर जातील, असा अंदाज तज्ज्ञाकडून वर्तवला आहे.

आजची सोन्याची नवी किंमत –
प्रति १० ग्रॅम – ४७, ९१८ रुपये

आजची चांदीची नवी किंमत –
प्रति किलो – ७१,३६४ रुपये

अशी तपासा सोन्याची शुद्धता?

ग्राहकाला सोन्याची शुद्धता तपासून बघ्याची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार केले आहे. BIS Care app द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासता येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्याबाबत तक्रार सुद्धा करू शकणार आहे. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा सापडल्यास तुम्ही तात्काळ तक्रार करू शकणार आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्या साठी माहिती देखील मिळणार आहे.