Gold-Silver Price | दिवाळी संपताच 0.3% ‘स्वस्त’ झाले सोने, चांदी घसरून 63,741 रुपयावर आली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold-Silver Price | मोठ्या उसळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत शुक्रवारी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याचा दर 0.03 टक्के कमी होऊन 47,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर कमी होऊन 63,741 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी गुरुवारी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान सोन्याच्या किमतीत 600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीच्या किमतीत 1,800 रुपये प्रति किलोची उसळी आली होती. (Gold-Silver Price)

 

जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये सोन्याची किंमत आज 1,792.74 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली.
तर चांदीचा हाजीर भाव (Spot Silver Price) 0.1 टक्के घसरून 23.75 डॉलर प्रति औंसवर आला.
तर प्लॅटिनमचा भाव 0.2 टक्के वाढून 1,027.84 डॉलर प्रति औंस झाला.

 

आगामी दिवसात वाढणार का सोन्याचा दर?

 

कॅनडाच्या गोल्ड मायनिंग इंडस्ट्रीसंबंधी दोन मोठ्या दिग्गजांचे म्हणणे आहे की, आगामी दिवसात सोन्याच्या किमतीत तेजी दिसू शकते.
कॅनडा गोल्ड कॉर्प इंकसोबत अगोदर काम केलेले डेव्हिड गारोफॉलो आणि रोब मॅक्विन (David Garofalo & Rob McEwen)
यांचे म्हणणे आहे की लवकरच महागाईमुळे दर वाढताना दिसू शकतात.
त्यांनी म्हटले की, सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहचू शकते.
जी सध्या 1,800 डॉलरच्या जवळपास आहे. तर McEwen चे मत आहे की, लाँग टर्ममध्ये सोने 5000 डॉलरचा स्तर सुद्धा गाठू शकते.

 

दरम्यान, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, ते अजूनही या मतावर कायम आहेत की, मागील काही दिवसांपासून दिसणारी महागाई ‘अस्थायी‘ आहे.
शुक्रवारी आणखी एका प्रमुख सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंडने आपला व्याजदर 0.1 टक्केच्या विक्रमी खालच्या स्तरावर कायम ठेवण्याची घोषणा केली.
मात्र, यासोबत संकेत सुद्धा दिला आहे की, आगामी काळात महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी दर वाढवले जाऊ शकतात. (Gold-Silver Price)

 

Web Title : Gold-Silver Price | gold and silver price rate today declined on mcx after sharp jump in previous session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Cruise Drugs Case | कोण आहेत आर्यन केसमधील नवीन NCB अधिकारी संजय सिंह, ‘या’ प्रकरणांचा केला होता तपास

Whatsapp New Update | आता 4 डिव्हाईसमध्ये चालेल व्हॉट्सअ‍ॅप, मोबाइल इंटरनेट कनेक्शनची सुद्धा नाही गरज; जाणून घ्या

CBSE | सीबीएसईने 10 वी – 12 वी च्या परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय ! जारी केली नवीन मार्गदर्शकतत्त्वे