Gold silver Price | सोने झाले महाग, चांदीने सुद्धा घेतली उसळी, जाणून घ्या 1 तोळ्याचा आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold silver Price | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 13 जानेवारी 2022 ला सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. तर, चांदीच्या दराने सुद्धा उसळी घेतली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात अवघी 119 रुपयांची तेजी नोंदली गेली. तर, चांदीच्या दराने आज 745 रुपयांची उसळी घेतली. (Gold silver Price)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 119 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 46,919 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 745 रुपयांच्या तेजीनंतर 60,777 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदी 60,032 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Silver Price | gold price today 13 january 2022 gold climbs rs 119 silver jumps rs 745 check sonya chandi che aaj che dar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा