खुशखबर ! नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच सोन्याच्या दरात घसरणं पाहायला मिळाली, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत असल्याने आणि जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याने ही घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्लीत सराफ बाजारात सोने 101 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीच्या किंमती देखील कमी झाल्या. चांदीच्या किंमतीत 29 रुपयांची घसरण झाली.

सोन्याच्या किंमती
मंगळवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 39,314 रुपये प्रति 10 ग्रॅम वरुन 39,213 रुपये 10 ग्रॅम झाल्या. सोमवारी सोन्याच्या दरात 78 रुपयांनी वाढ झाली होती, त्यामुळे सोने वाढून 39,263 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

चांदीच्या किंमती
दिल्लीत चांदीच्या किंमतीत 29 रुपयांनी घसरण होऊन 47,583 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. तर सोमवारी चांदीचे दर 245 रुपयांनी वाढून 47,735 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते.

3 वर्षात कमी झाली सोन्याची मागणी
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलकडून देण्यात आलेल्या एक अहवालानुसार सोन्याची मागणी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत वाढून 1,107.9 टन वर पोहचली होती. एक वर्षाआधी याच कालावधीत सोन्याची मागणी 1,079 टन होती. या दरम्यान भारतात सोन्याची मागणी 32 टक्क्यांनी कमी होऊन 123.9 टनवर आली आहे. सध्याची सोन्याची मागणी 3 वर्षापूर्वी असलेल्या मागणी पेक्षा कमी स्तरावर आहे.

डल्ब्यूजीसीच्या अहवालानुसार, सराफ आयात केलेल्या स्टॉक आणि रिसायक्लिंगवरुन सध्या बाजारातील मागणी पूर्ण करत आहे. यामुळे आयातीत घसरण झाली आहे. तर स्थानिक बाजारात सप्टेंबरमध्ये सोन्याचे भाव 39,011 रुपये प्रति 10 ग्रॅम होते जे आता 38,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. यामुळे महाग होणाऱ्या सोन्यामुळे मागणीवर परिणाम होईल.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास