Gold Silver Price | धनत्रयोदशीच्या 18 दिवस अगोदर किती झाला सोन्याचा दर, ऑक्टोबरमध्ये चांदीत 3600 रुपयांपेक्षा जास्त वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Silver Price | सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पहायला मिळाली होती. आता चीन आणि भारतात फिजिकल गोल्ड (physical gold) च्या मागणीत वाढ झाल्याने किंमतीत आणखी तेजी दिसू लागली आहे. ऑक्टोबरचा अर्धा महिनाच झाला असताना सोने 700 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहे. तर चांदीची किंमत 3600 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढून पुन्हा 63 हजार रुपयांच्या स्तराच्या पुढे गेली (Gold Silver Price) आहे.

येत्या 18 दिवसानंतर देशात धनत्रयोदशीचा (dhantrayodashi) सण आहे. या दिवशी सोने आणि चांदी खरेदीचे विशेष महत्व असते.
अखेर धनत्रयोदशी (dhantrayodashi) पूर्वी सोने आणि चांदीचे भाव काय आहेत आणि धनत्रयोदशीला अंदाजे सोन्याचा दर (Gold Silver Price) काय असेल ते जाणून घेवूयात…

सोन्याचा दर 47 हजार रुपयांच्या पुढे

शुक्रवारी अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्यात 650 रुपये प्रति दहा ग्रॅमपेक्षा जास्त घसरण दिसून आली, परंतु मागील महिन्याच्या तुलनेत किंमत 47 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.
मल्टी कमोडिटी इंडेक्स्च्या आकड्यानुसार 15 ऑक्टोबरला सोने 47,123 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले आहे.
तर मागील महिन्यात सोन्याचा दर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर (Gold Silver Price) होता.

चांदीचा दर 63 हजाराच्या पुढे गेला

चांदीच्या दरात सुद्धा ऑक्टोबर महिन्यात ओव्हरऑल वाढ दिसून आली आहे.
शुक्रवारी मल्टी कमोडिटी इंडेक्सनुसार चांदीत 300 रुपयांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली.
ज्यानंतर दर 63,271 रुपयांवर आला आहे. तर मागील महिन्यात चांदीचा दर 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली गेला होता.
अशावेळी अपेक्षा आहे की, आगामी दिवसात चांदीच्या दरात आणखी वाढ पहायला मिळेल.

ऑक्टोबरमध्ये किती झाली सोन्यात वाढ

ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या किमतीत चांगली वाढ पहायला मिळाली. आकड्यांनुसार, 30 सप्टेंबरला सोने 46,506 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते.
जे 15 ऑक्टोबरला 47,213 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. याचा अर्थ असा आहे की सोने 707 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढले आहे.

 

चांदीच्या दरात ऑक्टोबरमध्ये किती आली तेजी

तर दुसरीकडे चांदीच्या किमतीबाबत बोलायचे तर ऑक्टोबरमध्ये चांगली तेजी पहायला मिळाली आहे. एमसीएक्सनुसार, 30 सप्टेंबरला सोने 59,617 रुपये प्रति किलोग्रॅमवर होते.
तर 15 ऑक्टोबरला चांदीचा दर 63,271 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला.
म्हणजे मागील 15 दिवसात चांदीच्या दरात 3654 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ पहायला मिळाली आहे.

धनत्रयोदशीपर्यंत किती वाढू शकतो दर

आगामी पंधरवड्यात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ पहायला मिळू शकते. आयआयएफएलचे व्हाईस प्रेसीडेंट (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गप्ता यांच्यानुसार सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ पहायला मिळत आहे. भारत आणि चीन दोघेही जगातील सर्वात मोठे सोने ग्राहक आहेत.
अशावेळी धनत्रयोदशीपर्यंत सोन्याचा दर 50 हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Gold Silver Price | gold prices increased 18 days before dhanteras silver increased by more than rs 3600 in october

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | ‘सरकार ज्या दिवशी पडेल तेव्हा कळणारही नाही, पण..’, – देवेंद्र फडणवीस

काय आहे Masked Aadhaar Card, काय आहेत याचे फायदे आणि कसे होते तयार, जाणून घ्या सविस्तर

Ulhasnagar Crime | उल्हासनगरमध्ये ऑन डयुटी असणार्‍या पोलिसावर खुनीहल्ला ! अंमलदार रक्ताच्या थारोळयात पडल्यानं परिसरात प्रचंड खळबळ (व्हिडीओ)