‘सोनं-चांदी’ पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – दोन दिवसांच्या घसरणीनंतर आता सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांत घसरणं आली आहे त्यामुळे सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. दिल्लीत सराफ बाजारात सोने गुरुवार 70 रुपयांना महागले. तर चांदी देखील महागली. चांदी 230 रुपयांनी महागली.

तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि चीनचे व्यापर युद्धावरील पर्याय म्हणून करण्यात आलेला करार पुढे ढकलला जाऊ शकतो. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूकीकडे ओढले जात आहेत. ज्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर वेगाने होत आहे.

सोन्याचे दर –
गुरुवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याचे दर 38,860 रुपयांवरुन 38,930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे भाव 38,860 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,487 डॉलर प्रति औंस तर चांदी 17.54 डॉलर प्रति औंस राहिले.

चांदीचे दर –
दिल्लीत एक किलो चांदी 230 रुपयांनी महागली, त्यामुळे चांदी 46,510 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. बुधवारी चांदीचे दर 46,509 रुपये प्रति किलोग्रॅम होते.

सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता –
केडिया कमोडिटीचे अजय केडिया यांनी सांगितले की ग्लोबल स्लो-डाऊनच्या कारणाने सोन्याच्या किंमती वाढत आहेत, परंतू जगभरातील अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा बुस्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. अशाने लोक सोने सोडून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. परंतू सोन्याच्या किंमती 3 – 4 टक्क्यांनी पुन्हा घसरु शकतात.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके