Gold-Silver Price | या आठवड्यात 837 रुपये स्वस्त झाली चांदी, सोन्याचा सुद्धा घसरला भाव; जाणून घ्या किती कमी झाले सोने-चांदी
नवी दिल्ली : Gold-Silver Price | भारतीय सराफा बाजारात या व्यवहाराच्या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात (Gold-Silver Price) घसरण दिसून आली. सोन्याची किंमत 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आहे. तर, चांदीचा दर 61 हजार रुपयांच्या जवळपास पोहचला आहे. संपूर्ण व्यवहारी आठवड्यात राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेचे 24 कॅरेट सोने (Gold) 59 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. तर 999 शुद्धतेच्या चांदीमध्ये (Silver) 837 रुपये प्रति किलोची घसरण नोंदली गेली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, व्यवहाराच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबरला (सोमवार) सायंकाळी 24 कॅरेटचे सोने (Gold Rate) 47875 रुपये प्रति 10 ग्रॅम होते जे मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 10 डिसेंबर (शुक्रवार) पर्यंत 59 रुपयांच्या घसरणीसह 47816 रुपयांपर्यंत आले आहे. अशाप्रकारे शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदीचे भाव घसरले आहेत. (Gold-Silver Price)
सोमवार से शुक्रवारपर्यंत किती बदलला सोने-चांदीचा दर
शुद्धता 06 डिसेंबरचा दर 10 डिसेंबरचा दर किती स्वस्त/महाग झाले
सोने (प्रति 10 ग्रॅम) 999 47875 47816 59
Gold (प्रति 10 ग्रॅम) 995 47683 47625 58
सोने (प्रति 10 ग्रॅम) 916 43854 43799 55
Gold (प्रति 10 ग्रॅम) 750 35906 35862 44
सोने (प्रति 10 ग्रॅम) 585 28007 27972 35
चांदी (प्रति 1 किलो) 999 60992 60155 837
Sone Chandi Bhav, India Bullion And Jewellers Association
Web Title :- Gold-Silver Price | gold silver price gold price down silver rate weekly sonya chandi cha bhav
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- #FraudAlert | तुम्हाला मेसेज आला का? विक्रमी व्हॅक्सीनेशनमुळे सरकार देत आहे 3 महिन्यांचे मोफत रिचार्ज, जाणून घ्या काय आहे सत्य
- 7th Pay Commission | 20 हजार रुपयांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळवू शकतात कर्मचारी, नवीन वर्षात भेट देऊ शकते मोदी सरकार
- Pune Crime | 7 वर्षाच्या पुतणीवर लैगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार