Gold Prices Today : सोन्या-चांदीच्या दरात झाले ‘हे’ बदल, जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या दरात आज तेजी आल्याचे पाहायला मिळाले. आज सोनं 52 रुपयांनी महागलं. तर चांदीचे दर देखील वाढले. चांदी 190 रुपयांनी महागली आहे. मागील आठवड्यात कामकाजी दिवसात सोन्या चांदीच्या किंमतीत तेजी आली होती. HDFC सिक्योरिटीजच्या मते अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात उतार – चढाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत आलेली मजबूती याचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारात पाहायला मिळाला.

सोन्याचे दर –
सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 41,508 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आज सोनं 52 रुपयांनी महागलं. शुक्रवारी सोनं 112 रुपयांनी महागले होते.

चांदीचे दर –
सोन्यासह चांदीच्या दरात देखील तेजी आली. दिल्ली सराफ बाजारात चांदी 47,396 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,574 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.80 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

सोनं चांदी का महागलं –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियरअ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की कोरोना व्हायरसने 900 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीतील तेजी पहायला मिळत आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्याला आधार मिळाला.

सोन्याच्या किंमतीत येऊ शकते तेजी –
सध्या चीनमधील कोरोना व्हायरसमुळे आता जग स्लोडाऊनची चिंता करु लागले आहे. जर असे झाले तर इक्विटी मार्केटमध्ये अस्थिरता येईल. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत तेजी येत आहे. तर दुसरीकडे अद्यापही चीन आणि अमेरिकेमधील व्यापार करारावर सहमती झालेली नाही.