सोन्याच्या घसरणीनंतर चांदीही स्वस्त, 1217 रुपयांनी घसरले दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात दहा ग्रॅम सोन्याच्या किमतीत 217 रुपयांनी घसरण झाली. सोन्याप्रमाणेच चांदीही कमकुवत राहिली. एक किलो चांदीची किंमत 1,217 रुपयांनी घसरली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते डॉलरची मजबुती आणि अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्ये वाढ यामुळे सोन्यावर दबाव आला आहे. दरम्यान, ऑगस्टमधील ऑल टाइम हाय सोने आता 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56200 रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

सोन्याच्या नवीन किमती : गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 44,589 रुपयांवरून 44,372 रुपयांवर गेले. अशा प्रकारे सोन्याच्या किंमती 217 रुपयांनी खाली आल्या आहेत. बुधवारी सोन्याचे दर दहा ग्रॅममध्ये 208 रुपयांनी स्वस्त झाले.

चांदीच्या नवीन किमती : त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 67,815 रुपयांवरून घसरून 66,598 रुपये प्रतिकिलोवर आला. यासह बुधवारी सराफा बाजारात चांदी 602 रुपयांनी वाढली होती.

का स्वस्त झाले सोने :
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, कोरोना लसीच्या रोलआऊटमुळे गुंतवणूकदारांचे सेंटीमेंट बूस्ट झाले आहेत आणि त्यामुळे सुरक्षित हेवनची  मागणी कमी झाली आहे. पटेल पुढे म्हणाले की, सोन्याच्या किंमतीतील घसरण मजबूत डॉलर आणि अमेरिकेच्या ट्रेझरी  यील्डमधील वाढीमुळे झाली आहे. व्यापारी  गुरुवारी अमेरिकन फेड अध्यक्षांच्या टिप्पण्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अमेरिकी डॉलरमध्ये मजबुती आल्याने  आणि स्थानिक शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान रुपया गुरुवारी 11 पैशांनी घसरून 72.83 डॉलर प्रति डॉलरवर बंद झाला. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे वायदा 0.34 टक्क्यांनी घसरून 63.85 डॉलर प्रति बॅरलवर आहे.