Gold-Silver Update : मार्चनंतर सर्वात स्वस्त झालं ‘सोनं-चांदी’, डॉलरमुळं वाढली चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीदरम्यान मागच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे. मार्चनंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत आगामी तेजीबाबत अनिश्चितता कायम आहे. यादरम्यान डॉलरमध्ये सुद्धा तेजी दिसून येत आहे. याच कारणामुळे आता सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. कोविड-19च्या वाढत्या प्रकरणांमुळे आर्थिक रिकव्हरीचा अंदाज कमजोर ठरत आहे, विशेषता युरोमध्ये.

यापुढेही डॉलरमध्ये तेजीचा अंदाज
मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात 4.6 टक्केची घसरण आली आहे. तर चांदी सुद्धा 15 टक्के पर्यंत घसरली आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, डॉलरमध्ये मजबूती आल्याने सोन्याच्या दरावर दबाव वाढत आहे. अंदाज आहे की, पुढील आठवड्यात अन्य करन्सीच्या तुलनेत डॉलरमध्ये मागील 6 महिन्यातील सर्वात मोठी तेजी दिसू शकते.

सोन्याच्या किमतीमध्ये तेजीतून महागाईला मात देण्यात मदत मिळते. परंतु, ग्राहक मुल्यातील वाढीमुळे आता सोन्याच्या दराला झटका बसत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, केवळ केंद्रीय बँक एकट्याने अर्थव्यवस्था ठिक करू शकत नाही. कोरोनाच्या आकड्यात वाढ होण्याने महागाईची भीती वाढली आहे. यामुळे याचा परिणाम सोन्याच्या दरावर सुद्धा पडत आहे.

प्लॅटिनमच्या भावात सुद्धा घसरण
अमेरिकन सीनेट आता 2.5 लाख कोटी डॉलरच्या पुढील प्रोत्साहन पॅकेजवर काम करत आहे. पुढील आठवड्यातच याच्याशी संबंधित बिल पास होऊ शकते. सोने आणि चांदीशिवाय प्लॅटिनमच्या भावात सुद्धा मोठी घसरण नोंदली जात आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा विचार करून सुद्धा गुंतवणुकदार आता सतर्क दिसत आहेत. जाणकारांचे म्हणणे आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि राजकीय तणावामुळे आर्थिक अनिश्चितता कायम राहील.

स्थानिक बाजारात सुद्धा घसरले दर
स्थानिक बाजाराचा विचार करता मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी सोन्याचा वायदा भाव 238 रुपयांनी घसरून 49,666 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. गोल्डच्या सोबतच चांदीमध्ये सुद्धा घसरण पहायला मिळाली. चांदी सुमारे 1 टक्के घसरून 59,018 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. साप्ताहिक आधारावर पाहिले तर सोन्याच्या भावात सुमारे 2,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. तर चांदी सुमारे 9,000 रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त उतरली आहे.