Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर वधारले, जाणून घ्या आजचे नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Silver Price) सतत चढउतार दिसून येत आहे. मागील काही दिवसामध्ये सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण होत होती. आता मात्र, सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price) वाधरल्या आहेत.

8 जून  सोन्याच्या भावात 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीत 0.22 टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत आहे.

आज एमसीएक्सवर ऑगस्टच्या वायद्यात सोन्याच्या भावात 0.10 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति तोळा प्रमाणे 49,174 रुपये झाले आहे. तसेच, चांदीच्या किंमतीत 0.22 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति किलो प्रमाणे, 71,388 रुपये इतके झाले आहे.

सोन्याचे आणि चांदीचे नवीन भाव –

– सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 49,174 रुपये आहेत.
– चांदीचा दर प्रति किलो 71,388 रुपये आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या सोन स्वस्त –

मागील वर्षी ऑगष्ट महिन्यात सोन्याचा भाव प्रति तोळा प्रमाणे 56,200 रुपये होता.

मात्र, सध्या गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याची किंमत सात हजार पेक्षा कमीच आहे.

सोन्याचा भाव का वाढतोय?

कोरोनाच्या उदभवलेल्या दुसऱ्या आणि येणार्या तिसऱ्या लाटेचा परिणाम तसेच अमेरिकन ट्रेजरीची घटणारी कमाई, कमजोर अमेरिकन डॉलर यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.

सोन्याची शुद्धता तपासा –

आता जर ग्राहकाला सोन्याची शुद्धता तपासून पाहायचे असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार केले आहे.

‘BIS Care app’ सह ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकणार आहे. या अ‍ॅपद्वारे आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर त्याबाबत कोणतीही तक्रार सुद्धा करू शकणार आहे.

या अ‍ॅपमध्ये लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याबद्दल त्वरित तक्रार करू शकेल.

या App द्वारे ग्राहकांना त्वरित तक्रार सुद्धा माहिती मिळणार आहे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

 

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

 

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणूनघ्या

 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर