Today Gold Rate : सोनं खरेदी करण्याची चांगली संधी, उच्चांकीवरून Gold 10000 रुपयांनी स्वस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या संकट काळात सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक झाल्याने सोन्याचे दर विक्रमी स्तरवर गेले होते. मात्र, आता सोन्याच्या दरात घरसण होत आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असताना आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आजचे सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. MCX वर सोन्याचे दर 0.5 टक्क्यांनी कमी होऊन सोने 45 हजार 704 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.24 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदीचा दर 68 हजार 470 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने सोन्याचे दर गगनाला भिडले होते. सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवक्या बाहेर गेले होते. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये या विक्रमी स्तरावर पोहचले होते. त्यानंतर आजपर्यंत सोन्याच्या दरात 10000 रुपयांची घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.

सोन्याचे नवे दर

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 61 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी (दि. 30) सोन्याचे भाव 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 46 हजार 704 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. गेल्या आठ महिन्यातील कमी स्तरावर सोन्याचे दर आहेत. गुरुवारी सोन्याचे दर काहीसे वाढले होते.

चांदिचे नवे दर

दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या किमतीत देखील घसरण झाली आहे. 0.24 टक्क्यांच्या या घसरणीनंतर चांदीचे दर 67 हजार 470 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले आहेत.