Gold-Silver Price : सराफा बाजारात सोनं 485 तर चांदी 2081 रूपयांनी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. वास्तविक जागतिक बाजारात पिवळ्या धातूच्या भावात काही दिवसांपासून घट दिसत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोने ४८५ रुपये प्रति १० ग्रामने स्वस्त झाले आहे. याव्यक्तिरिक्त चांदीचे भावही आज २००० रुपयांनी खाली आले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या भावात घसरणीचा ट्रेंड सलग तिसर्‍या दिवशीही कायम आहे. अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे परकीय बाजारात सोन्याचा भाव २ टक्क्यांनी घसरून १८६२ डॉलर प्रति औंसवर आला आहे. म्हणूनच देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी स्वस्त झाली आहे. चार दिवसांत सोने आतापर्यंत सुमारे २,५०० रुपये प्रति १० दराने स्वस्त झाले आहे. मागील सत्रात सोने ९५० रुपये प्रति १० ग्रामने घसरले होते, तर बुधवारी चांदीचा भाव ४.५ टक्के किंवा २,७०० रुपये प्रति किलोग्रामने खाली आला होता.

सोन्या-चांदीत एवढी मोठी घट का झाली ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, ‘दिल्लीमध्ये २४ कॅरेट शुद्ध हाजीर सोन्याचा भाव ४८५ रुपये प्रति १० ग्रामने कमी झाली आहे. हे आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्री दर्शवते. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही मौल्यवान धातूमध्ये घट होत आहे.’ ते पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये युरोपमध्ये आर्थिक हालचालींवर डॉलरची ताकद भारी पडत आहे. हेच कारण आहे की, काही काळापासून सोन्याच्या भावात घट होत आहे.

रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च अनॅलिस्ट श्रीराम अय्यर म्हणाले की, गुरुवारी देखील आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांना सोने-चांदीच्या आघाडीवर नुकसान झाले. गुरुवारी दुपारच्या सत्रात डॉलरमध्ये मजबुती दिसून आली. परकीय बाजारात कमकुवत किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात किंमतीत घट झाली आहे.

चांदीचा नवीन भाव
आज चांदीच्या भावातही मोठी घट झाली. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात चांदी २०८१ रुपये प्रति किलोग्रॅम कमी होऊन ६० हजार रुपये खाली आली आहे. चांदीचा नवीन भाव ५८,०९९ रुपये प्रति कोलोग्रॅम आहे. यापूर्वी चांदीचा भाव ६०,१८० रुपये प्रति किलोग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव २२.१२ डॉलर प्रति औसवर आहे.

सोन्याचा नवीन भाव
जागतिक बाजारात कमजोरीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आज ४८५ रुपये प्रति १० ग्राम स्वस्त होऊन ५०,४१८ रुपयांच्या स्तरावर गेले आहे. यापूर्वी पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव ५०,९०३ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,८५४ डॉलर प्रति औस आहे.