Gold-Silver Price : सुमारे एक महिन्याच्या खालच्या स्तरावर पोहचली सोन्याची वायदा किंमत, लागोपाठ चौथ्या दिवशी झाली घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक दर कमजोर असताना आज भारतीय बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या वायदा किंमतीमध्ये मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोन्याची वायदा किंमत 0.6 टक्के घसरून एक महिन्याच्या खालच्या स्तराच्या सुमारे 48,845 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली. लागोपाठ चौथ्या दिवशी यामध्ये घसरण नोंदली गेली आहे. एमसीएक्सवर चांदी वायदा सुद्धा 0.6 टक्के घसरून 66,130 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली. प्रजासत्ताक दिनी मंगळवारी भारतीय बाजार बंद होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात इतके होते दर
अंतरराष्ट्रीय बाजारात, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या चलन धोरणाच्या निर्णयाच्या पूर्वी आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. सोने 0.3 टक्के घसरून 1,845.30 डॉलर प्रति औंस झाले, तर चांदी 25.43 डॉलर प्रति औंसवर बंद झाली होती. मात्र, अमेरिकन केंद्रीय बँकेद्वारे कोणतीही मोठी घोषणा होण्याची अपेक्षा नाही, परंतु व्यापारी चलन धोरणाच्या नव्या योजनांबाबत जाणून घेण्यास इच्छुक आहेत.

कमजोर गुंतवणूक कल दर्शवतो ईटीएफचा प्रवाह
जगातील सर्वात मोठा गोल्ड समर्थित एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा गोल्ड ईटीएफ, एसपीडीआर गोल्ड ट्रस्टचे होल्डिंग्स मंगळवारी 0.1 टक्के घसरून 1,172.38 टन झाले. सुवर्ण ईटीएफ सोन्याच्या किंमतीवर अधारित असतात आणि त्याच्या भावात होणारी वाढ-घट यावर त्याचा दरसुद्धा घटतो किंवा वाढतो. ईटीएफचा प्रवाह सोन्यात कमजोर गुंतवणूक कल दर्शवतो. एक मजबूत डॉलर अन्य चलन धारकांसाठी सोन्याला अधिक महाग बनवतो.