Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर कमी होत आहे. तर आज पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा दर 457 रुपयांनी कमी झाला असून, सोने प्रतिदहा ग्रॅमसाठी 46,390 रुपये झाले आहे. याशिवाय चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.

‘गुड रिटर्न्स’च्या रिपोर्टनुसार, सोन्याचा दर 457 रुपयांनी कमी होऊन आता 46,390 वर गेला आहे. याशिवाय चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रतिकिलो झाला आहे. मागील सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी 68,241 रुपये प्रतिग्रॅम या दरात होती. पण आता चांदीचे दरही कमी झाले आहेत. तर सोन्याच्या दरात 661 रुपयांची घरसण झाली होती. त्यानंतर सोने 46,847 रुपये प्रतिदहा ग्रॅम झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर :
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1815 डॉलर प्रति औंस स्तरावर आणि चांदी 26.96 डॉलर प्रति औंसवर होते.

सोन्याचे दर काय ?
दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोने 46,390 रुपये प्रतिदहा ग्रॅम आहे. तर मुंबईत 46,430 रुपये आहे. याशिवाय चेन्नईत 10 ग्रॅमचे 22 कॅरेट सोन्याचा दर 44,650 होता. तर आता 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,710 रुपयांवर होता.

चांदीचा भाव काय ?
शनिवारी चांदीच्या दरात कपात झाली आहे. आता यामध्ये 347 रुपयांनी कपात होऊन चांदी 67,894 रुपये प्रतिकिलोवर आली आहे.