ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंच्या किमतीत मंगळवारी रात्रीच्या घसरणीनंतर दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 119 रुपयांच्या घसरणीसह 46,613 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. (Gold-Silver Price Today)

 

मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 46,732 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीच्या किंमतीत सुद्धा 517 रुपये कमी होऊन 61,671 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात चांदी 62,188 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीसह 1,794 डॉलर प्रति औंस होते, तर चांदीची किंमत 23.66 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली. (Gold-Silver Price Today)

 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटले की, रुपयाच्या मूल्यात घसरण आली तसेच कॉमेक्स (न्यूयॉर्क येथील जिंस एक्सचेंज) मध्ये घसरणीसह दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या हाजीर भावात 119 रुपयांची घसरण झाली.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold-Silver Price Today | gold declines rs 119 silver tumbles rs 517 know todays rate gold rate in india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | 37 लाखांच्या फसवणूक प्रकरणी श्री ट्रेडर्सच्या प्रदिप म्हात्रे आणि व्हीजन आयटी सोल्युशनच्या जयेश म्हात्रेविरूध्द गुन्हा

Maharashtra Health Department | सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘या’ उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा होणार

Aarya-2 Motion Poster | ‘आर्या 2’चं मोशन पोस्टर रिलीज, सुस्मिता सेनचं क्रूर रूप पाहून तुम्हीही व्हाल थक्क..!

Back to top button