‘सोनं-चांदी’ झालंं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे सोन्याचे ‘भाव’

नवी दिल्ली  वृत्तसंस्था – मागणी घटल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याची पाहायला मिळाले. सराफ बाजारात सोन्याचे भाव 30 रुपये कमी झाले. तर सोन्या बरोबरच आता चकाकणाऱ्या चांदीच्या दरात देखील कपात झाल्याचे दिसले. चांदीचे दर 90 रुपयांनी कमी झाले.

Gold
File Photo

सोन्याचे दर –
सोमवारी सोने सराफ बाजारात 10 ग्रॅममागे 30 रुपयांनी स्वस्त होऊन 39,210 रुपये झाले. शनिवारी सोने 39,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने 1,503 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 17.47 डॉलर प्रति औंस होते.

 

Silver
file photo

चांदीच्या दरात घसरण –
चांदीचे भाव 90 रुपयांनी घसरुन 46,390 रुपये प्रति किलोग्रॅम झाले तर शनिवारी चांदी 46,480 रुपये प्रति किलोवर बंद झाले.

सोन्याच्या दरात होणाऱ्या घसरणीचे कारण –
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या सीनियर एनालिस्टचे म्हणणे आहे की या आठवड्यात आलेल्या सुट्ट्यामुळे मागणी कमी झाली आहे. सोन्याच्या मागणीत घसरण होताना दिसत आहे. ते म्हणाले की रुपया कमकुवत असल्याने सोन्याच्या भावात घसरण होताना दिसत आहे. तर अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाचा परिणाम देखील होत आहे.

ते म्हणाले की सोन्याला लागोपाठ ETF वाढल्याने आणि इतर इमर्जिंग इकोनॉमीमध्य तेजी आल्याने सोन्याच्या किंमतीला सपोर्ट मिळाला आहे.

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या सोन्याच्या किंमती –
तुम्ही जे सोने खरेदी करतात त्यांची किंमत स्पॉट प्राइस म्हणजेच हाजिर भाव असतो. अनेक शहरात सराफ असोसिएशनचे सदस्य मिळून बाजार सुरु होण्याआधी किंमत निश्चित करतात. MCX वायदा बाजारात देखील सोन्याचे भाव येतात, लेवी किंवा सोने घडण याचे दर लावून सोन्याचे दर निश्चित केले जातात. तेच दर दिवसभर चालतात. त्यामुळे अनेकदा विविध शहरात सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. याशिवाय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत शुद्धतेच्या आधारे निश्चित केली जाते. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

Visit : Policenama.com