सोन्याच्या दराचा नवा ‘रेकॉर्ड’ ! जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतींमध्ये सध्या सुरू असलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाही. सर्वसामान्य नागरिकांना सोने विकत घेणे दिवसेंदिवस मुश्किल होत चालले आहे. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार्‍या किंमतींचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे. अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दहा ग्रॅम सोन्याची किंमत ३९,९७० रुपयांवरून ४०,२२० रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली असून दिल्लीत एक किलो चांदीची किंमत २०० रुपये किलोने वाढून ४९,०५० रुपये प्रति किलो झाली आहे.

सोन्याचे नवीन भाव :
देशाची राजधानी दिल्ली येथे ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असणाऱ्या सोन्याचा भाव प्रत्येकी २५० रुपयांनी वाढून अनुक्रमे ४०,२२० आणि ४०,०५० रुपये प्रती तोळ्यापर्यंत पोहोचला. गिन्नीचा भावही २०० रुपयांनी वाढून २७,८०० प्रति आठ ग्रॅम इतका झाला.

चांदीचे नवीन भाव :
सोन्याबरोबर चांदीचेही भाव २०० रुपयांनी वधारले असून ४९,०५० प्रतिकिलो इतकी झाली आहे. त्याचबरोबर साप्ताहिक डिलिव्हरीसाठीची चांदी ८१४ रुपयांनी वाढून ४७,२३० रुपये प्रतिकिलोवर आली.

सोन्याचे दर का वाढत आहेत :
तज्ञांचे म्हणणे आहे की जगभरातील मध्यवर्ती बँका सातत्याने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करीत आहेत. तसेच जागतिक मंदीबाबत चिंता अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमती वाढत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –