Gold Silver Price Today | ग्राहकांनो, सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोनं खरेदीसाठी ग्राहकांना एक सुवर्णसंधी म्हणावी लागेल. दरम्यान आठवड्यात सोन्याच्या भावात (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 1129 रुपयांची घट नोंदवली आहे, तर चांदीच्या किमतीत (Silver Price) 3424 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

 

व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (18 मार्च ते 22 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,603 होता, जो शुक्रवारपर्यंत 52,474 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला. तसेच 999 शुद्धतेच्या चांदीचा दर 70,109 रुपयांवरून 66,685 रुपये प्रति किलोवर आला आहे. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. याबाबत माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार समोर आली.

 

मागील एका आठवड्यामध्ये सोन्याचा भाव किती बदलला ? – (प्रति 10 ग्रॅम)

18 एप्रिल 2022 – 53,603 रुपये

19 एप्रिल 2022 – 53,499 रुपये

20 एप्रिल 2022 – 52,752 रुपये

21 एप्रिल 2022 – रुपये 52,540

22 एप्रिल 2022 – रुपये 52,474

 

मागील एका आठवड्यामध्ये चांदीचा भाव किती बदलला ? – (प्रति किलो)

18 एप्रिल 2022 – 70,109 रुपये

19 एप्रिल 2022 – 70,344 रुपये

20 एप्रिल 2022 – 68,590 रुपये

21 एप्रिल 2022 – 67,330 रुपये

22 एप्रिल 2022 – 66,685 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price drop silver also dip one business week check latest rate of gold sonya chandi che dar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा