Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) सातत्याने बदलत असतात. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात वाढ होताना पाहायला मिळालं. मात्र, दोन दिवसांच्या तेजीनंतर आज (बुधवारी) सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर, चांदीचे दर वधारले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price) 47,795 आहे. तर, चांदीचा दर (Silver Price) 62,376 रुपये पर्यंत पोहचला आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज डिसेंबर डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.02 टक्के घसरणीची नोंद झाली. तर चांदीचा दर 0.14 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर पन्नास हजाराच्या पुढे होता. दरम्यान, त्या तुलनेत यंदाचा सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

सोन्याची शुद्धता कशी तपासाल ?

‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकणार आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळणार आहे.

दरम्यान, तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

Web Title : Gold Silver Price Today | gold price fall on today 1 december 2021 and silver rate rose check latest gold and silver rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या