सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावार आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. या कारणाने आज सराफ बाजारात सोनं महागलं. दिल्लीत आज सोने सलग दुसऱ्या दिवशी महागलं. त्यामुळे बुधवारी सोनं 332 रुपयांनी महागलं. तर चांदी देखील थोडी थोडकी नाही तर जवळपास 676 रुपयांनी महागली.

सोन्याचे दर –
दिल्लीत सराफ बाजारात सोनं 322 रुपयांनी महागल्याने सोनं 39, 299 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलं. मंगळवारी 99.9 टक्के शुद्ध सोने 38,967 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

चांदीचे दर –
दिल्ली सराफ बाजारात आज चांदी 676 रुपयांनी महागल्याने चांदी 46,672 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. औद्योगिक क्षेत्रात चांदीची मागणी वाढल्याने चांदी महागली आहे. मंगळवारी चांदी 45,996 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत होती परंतू आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सोनं चांदी महागलं आहे.

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,483 डॉलर प्रति औंसवर पोहचले तर चांदी 17.27 डॉलर प्रति औंसवर पोहचली. डिसेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतील हा सर्वात मोठा उच्चांकी दर आहे.

Visit : policenama.com