Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या दरात चढउतार दिसून येत आहे. आज सोन्या – चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज (सोमवारी) सोन्याचा दर (Gold Price) 304 रुपयांनी वाढला तर चांदीचा भाव (Silver Price) 508 रुपयांनी वाढला आहे.

 

सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 304 रुपयांनी वाढून (24 कँरेट) 52,302 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आहे.
मागील ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 51,998 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
त्याचबरोबर चांदीचा दर 508 रुपयांनी वाढून 67,407 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.
गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 66,899 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

सोन्याचा भाव कसा शोधाल ?
तुम्ही सोन्याचा भाव घरबसल्या सहज शोधू शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.

 

दरम्यान, मागील आर्थिक वर्ष 2021 – 22 मध्ये चीनमधील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचलीय, ज्यामुळे देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) वर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, 2020 – 21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात $34.62 अब्ज होती.
भारतात सोन्याची आयात प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी केली जातेय.
2021 – 22 या आर्थिक वर्षात हिरे आणि दागिन्यांची निर्यात सुमारे 50 टक्क्यांनी वाढून $39 अब्ज झालीय.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price today 11 april 2022 gold rallies rs 304 silver jumps rs 508

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा