Gold Silver Price Today | सोन्याच्या किमतीत किंचित घट ! चांदीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gold Silver Price Today | आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात चढउतार दिसून आली. आज (शुक्रवारी) सोन्याच्या किमतीत (Gold Price) थोडीशी घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात आज प्रति 10 ग्रॅम 35 रुपयांनी घसरून 51,697 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आहे.

 

दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर (Silver Price) 295 रुपयांनी वाढून 66,752 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 66,457 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण तर चांदी वधारली असल्याचं दिसत आहे. (Gold Silver Price Today)

 

असा शोधा सोन्याचा दर –
आम्ही तुम्हाला सांगतो की हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.

कशी तपासाल सोन्याची शुद्धता?
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे.
‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे (BIS Care app) ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही,
तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात.
या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price today 8 april 2022 gold declines marginally by rs 35 silver jumps rs 295

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sonakshi Sinha Pregnancy Rumours | सोनाक्षी सिन्हानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी म्हणाले – ‘तू गरोदर आहेस का?’

 

ST Employees Protest | ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागचा सूत्रधार शोधणार, दोषींवर कारवाई करणार’, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती

 

Nilesh Rane On Sharad Pawar | ‘पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा’ – निलेश राणे