Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | देशाच्या बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today ) सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या मागे सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली होती. यानंतर गेल्या दोन दिवसापूर्वी साधारण घसरण पाहायला मिळाली. तर आज देखील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज गुरुवारी एमसीएक्सनुसार (MCX) सोने आणि चांदीचे दरही कमी झाले आहेत. ऑगस्टच्या डिलिव्हरीनुसार सोन्याचा भावात 0.22 टक्यानी घसरण तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) देखील आज 0.07 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे.

Extortion Case against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, इतर 6 पोलिसांसह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

gold price today down by 8530 rs from record high to 47470 per 10 gm check silver price

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे दर 56, 200 रुपये प्रति तोळाच्या जवळ होते. हा दर आतापर्यंतचा सर्वोच्च पातळीवर आहे. MCX वर आज सोन्याचा भाव 47,470 रुपये प्रति तोळा आहेत. म्हणजेच सोन्याचा भाव प्रति तोळा साधारण 8,530 रुपयांनी स्वस्त आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

एमसीएक्सनुसार (MCX) ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्यामध्ये आज 0.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर याच घसरणीनंतर सोन्याचा भाव 47,470 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर आहेत.

आजचा चांदीचा भाव –

आज चांदीची किंमत देखील 0.07 टक्क्यांनी घसरली आहे. चांदीच्या दरात आज किंचित घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीची किंमत 67,089 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहचली आहे.

दरम्यान, जर ग्राहकाला सोन्याची शुद्धता तपासून बघायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप बनवले आहे. BIS Care app च्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपच्या
माध्यमातून ग्राहक फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्याबाबत तक्रार देखील करू शकणार आहे.
दरम्यान, या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित
तक्रार करू शकतो. तसेच, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी
तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. www.ibja.com या वेबसाइटवर देखील सविस्तर माहिती दिली आहे.

हे देखील वाचा

Raj Kundra Porn Film case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; उमेश कामतच्या ऑफिसवर पोलिसांचा छापा; 70 अश्लील व्हिडीओ लागले हाती

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Silver Price Today | gold price today down by 8530 rs from record high to 47470 per 10 gm check silver price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update