Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price Today) बदलत असतात. त्याच प्रमाणे मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज देखील सोन्या चांदीचे दर कमीच आहे. आज (शुक्रवारी) सोन्याची किंमत 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह आज 47,481 रुपये प्रति तोळा आहे. तर, चांदी 0.04 टक्क्यांनी घसरले. या घसरणीनंतर 1 किलो चांदीचा दर 60,402 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किंमतीत (Gold Silver Price Today) 0.06 टक्क्यांची किंचित वाढ झाली असली तरी सोन्याचे दर हे कमीच आहेत. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर उतरताना दिसत आहे. अधिक दिवसांनंतर आज सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. तरीही सध्या सोनं स्वस्त आहे.

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

24 कॅरेट सोन्याचा भाव –

मुंबई – 48,820 रुपये

पुणे – 48,650 रुपये

नाशिक – 48,650 रुपये

नागपूर – 48,820 रुपये

22 कॅरेट सोन्याचा भाव –

मुंबई – 46,820 रुपये

पुणे – 46,130 रुपये

नाशिक – 46,130 रुपये

नागपूर – 46,820 रुपये

चांदीचा दर (प्रति किलो) –

मुंबई – 60,400 रुपये

पुणे – 60,400 रुपये

नाशिक – 60,400 रुपये

नागपूर – 60,400 रुपये

Web Title : Gold Silver Price Today | gold price today down by 8700 rupees from record high on 07 january 2022 silver slumps check rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत; जाणून घ्या कमतरतेची लक्षणे