खुशखबर ! सलग 5 व्या दिवशी सोनं झालं ‘स्वस्त’ पण चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोने 35 रुपयांनी स्वस्त झाले. चांदीच्या भावात मात्र वाढ झाली. चांदी आज 147 रुपयांनी महागली. तज्ज्ञांच्या मते रुपयात मजबूती आल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

सोन्याचे दर
बुधवारी सोने 35 रुपयांनी स्वस्त होऊन 38,503 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळवारी सोने 68 रुपयांनी स्वस्त झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,459 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 17.02 डॉलर प्रति औंस झाली होती.

चांदीचे दर
दिल्ली सराफ बाजारात चांदीच्या किंमती वाढल्यानंतर चांदी 45,345 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

तज्ज्ञांचे मत
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की डॉलरच्या तुलनेत रुपयात मजबूती आल्याने सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया लागोपाठ दुसऱ्या दिवसापेक्षा जास्त मजबूत झाला. बुधवारी उद्योगात डॉलरच्या तुलनेते रुपये 10 पैशांनी वाढून 71.40 च्या स्तरावर गेले.

तर अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारावर सहमती होताना दिसत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या किंमतीवर दबाव येत आहे.

सोन्याच्या दागिण्याचे भाव असे निश्चित करतात सराफ
1) तुम्हाला सराफाने लावलेल्या सोन्याच्या किंमतीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवता कामा नये. कारण हे आहे की ज्यामुळे अंतिम रक्कमेवर परिणाम होत असतो. यात सोन्याच्या किंमती, मेकिंग चार्ज, रत्नाचे मूल्य इत्यादींचा समावेश होतो. आज देखील देशात किंमत निश्चित करण्याचे मानक नाहीत. त्यामुळे सोन्याच्या दागिण्याच्या किंमतीत फरक असतो.

2) देशात बिल बनवण्याची कोणतीही मानक पद्धत नाही. प्रत्येक सराफाचे बिलिंग सिस्टीम वेगळी असते. प्रत्येक शहरात ज्वेलरी असोसिएशन आहे. ही असोसिएशन प्रत्येक सकाळी सोन्याच्या किंमती निश्चित करतात, याद्वारे शहरातील सोन्याचे भाव निश्चित होतात.

3) हा आहे दागिण्यांची किंमत निश्चित फॉर्म्युला –
दागिण्याची अंतिम किंमत सोन्याची किंमत = (22 कॅरेट किंवा 18 कॅरेट) X ग्रॅममधील भार + मेकिंग चार्ज + (दागिण्याची किंमत + मेकिंग चार्ज) यावर 3% जीएसटी

Visit : Policenama.com