खुशखबर ! सलग 6 व्या दिवशी सोनं ‘स्वस्त’, चांदीचे दर देखील घसरले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत होणारी घसरण सुरुच आहे. सलग 6 व्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. दिल्लीत सराफ बाजारात सोने 3 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरात देखील घसरणं पाहायला मिळाली. आज चांदी 91 रुपयांनी स्वस्त झाली. तज्ज्ञांच्या मते मागणी कमी झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण होताना दिसत आहे.

सोन्याचे दर
गुरुवारी सोने 38,535 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,457 डॉलर प्रति औंस झाले आणि चांदी 17 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचे दर
दिल्ली सराफ बाजारात चांदी 91 रुपयांनी स्वस्त झाली त्यामुळे चांदी 45,293 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

का घसरत आहेत सोन्या चांदीच्या किंमती
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, की सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या मागणीत घसरण झाली आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांनी मजबूत झाला. त्यामुळे 71.32 च्या स्तरावर गेला. ते म्हणाले की अमेरिका आणि चीनमधील व्यापार करार झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत उतार-चढाव दिसत आहे.

यामुळे आवश्यक आहे सोने खरेदीचे बिल
सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. त्यामुळे तुमच्याकडे सोने खरेदीचे बिल असणे आवश्यक आहे. या बिलाच्या माध्यमातून तुम्हाला सोन्याचे वजन, खरेदी करतानाची किंमत याची माहिती मिळेल. याशिवाय इनकम टॅक्स रिटर्नमध्ये या बिलाच्या मदतीने तुम्ही सोन्याच्या सोर्सची माहिती देऊ शकतात.

Visit : Policenama.com