सोनं – चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमती आज घसरण पाहायला मिळाली. भारतीय रुपया मजूबत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती घसरल्याने आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्लीत सोनं 74 रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदीच्या किंमतीत देखील घसरणं पाहायला मिळाली. चांदी 771 रुपयांनी स्वस्त झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धसंबंधित करारावर चर्चा सुरु झाली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारात तेजी आली आहे. गुंतवणूकादर सोने खरेदीपासून दूर झाला आहे.

सोन्याचे दर –
मंगळवारी आणि बुधवारी तेजी आल्यानंतर गुरुवारी सोन्याच्या किंमतीत घसरणं आली आहे. दिल्ली सराफ बाजारात गुरुवारी 99.9 टक्के शुद्ध सोनं 38,985 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्याच्या किंमतीत 74 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरणं झाली. तर बुधवारी सोनं 332 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि मंगळवारी 80 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले.

चांदीचे दर –
गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात चांदी 45,539 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. या दरम्यान चांदीच्या किंमती 771 रुपये प्रति किलोग्रॅमने घसरणं झाली.