खुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात मजबूती आल्याने स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी घसरणं आली आहे. दिल्लीत सोने 102 रुपयांनी स्वस्त झाले तर उद्योगात नसलेल्या मागणीमुळे चांदी देखील थोडी थोडकी नाही तर 815 रुपयांनी स्वस्त झाली.

सोन्याचे दर –
शुक्रवारी दिल्लीत सोन्याचे दर 102 रुपयांनी महागून 38,856 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी सोने 53 रुपयांनी स्वस्त झाले होते, त्यामुळे सोने गुरुवारी 39,007 रुपयांवर आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले आहे.

चांदीचे दर –
उद्योगातील मागणी घटल्याने चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. शुक्रवारी चांदी 815 रुपयांनी स्वस्त होऊन 44,949 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. गुरुवारी चांदी 45,830 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती.

सोनं का स्वस्त होत आहे –
तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या व्यापर करारावर सहमती झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यापेक्षा इतर ठिकाणी गुंतवणूक करताना दिसत आहे. तसेच अमेरिकी अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. रुपयात देखील मजबूती आली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com