Gold Silver Price Today | लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | जागतिक बाजारपेठेत (Global Market) सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. आज (गुरुवारी) सकाळी सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) बदल झाला आहे. मागणी वाढल्याने सोने महाग झाले, तर चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर (Gold Price) 25 रुपयांनी वाढून 50,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याआधी सोन्याचा व्यवहार 50,939 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला होता, पण कमी खरेदी आणि मागणीमुळे लवकरच त्याची किंमत 0.05 टक्क्यांनी वाढून 50,848 वर पोहोचली आहे.

 

चांदीचे भाव घसरले –
एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) आज सकाळी सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात (Silver Price) घसरण दिसून आली आहे. सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 351 रुपयांनी घसरून 60,401 रुपये प्रति किलो झाला आहे. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार 60,550 रुपये प्रति किलोच्या पातळीवर सुरू होता, परंतु लवकरच तो 0.58 टक्क्यांनी घसरून 60,401 च्या पातळीवर गेला. (Gold Silver Price Today)

जागतिक बाजारात तेजी –
जागतिक बाजारात आज सोन्या – चांदीच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
आज सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून $1,855.11 प्रति औंस झाली, तर चांदीची स्पॉट किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून $21.57 प्रति औंस झाली.
गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याच्या किमतीत सुमारे 1 टक्क्यांनी वाढ झाली होती.
जागतिक बाजारात प्लॅटिनमची किंमत 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 990,64 डॉलर प्रति औंस झाली आहे.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold prices surge due to strong global cues check latest rate here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा