Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाजारात दैनंदिन सोन्याचांदीच्या किमती वारंवार बदलत असतात. कधी सोन्याचांदीच्या किंमतीत घट होते तर कधी किंमतीत वाढ पाहायला मिळते. गेल्या अनेक आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घट दिसून येत होती. तर मागील दोन ते तीन दिवस सोन्याच्या दलात उसळी निर्माण झाली आहे. याचबरोबर चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) देखील वाढ पाहायला मिळत आहे. 30 जुलै रोजी सोन्याच्या भावात 310 रुपायाची वाढ झाली. आणि आज 10 रुपये म्हणजे किंचित वाढ झालीय. चांदीच्या भावात 30 जुलै रोजी 1 हजार रुपयाची वाढ झाली. तर, आज 10 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today gold rate hike by rs 320 and silver rate hike by rs 1010 in last two days

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या (Gold Price) किंमतीवर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. मागील काही महिन्यापासून सोन्याच्या दरात घट दिसून येत होती. मात्र त्यावेळी आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ होईल असे काही तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आता सोन्याच्या किंमतीत (Gold Price) वाढ होत आहे. सध्या सोन्याचा दर पुन्हा पन्नास हजारांकडे पोहचत आहे. गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांपर्यंत पोहचला होता. त्यात साधारण 8 हजार रुपयांची घसरण झाली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) च्या व्यवहारानुसार मागील दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या
दराला चांगलीच झळाळी पाहायला मिळत आहे. चांदीच्या किंमतीचा (Silver Price) विचार करता
27 जुलैला त्यामध्ये 400 रुपयांची घसरण झाली होती तर 28 जुलैला त्यामध्ये 700 रुपयांची
घसरण झाली होती. त्यानंतर 29 जुलैला 800 रुपये तर 30 जुलैला 1000 रुपयांची वाढ झाली
आहे. आज पुन्हा त्यामध्ये 10 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान जून महिन्यात चांदीचा भाव
72,600 रुपये होता. मात्र, सध्या 70 हजारांच्या आत आहे.

मुंबई आणि पुण्यातील दर –

24 कॅरेट सोन्याचा दर : 48,390 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर : 47,390 रुपये

चांदीचा दर (Silver Price) : 68,210 रुपये

हे देखील वाचा

Pune Crime | 6.75 कोटीचं प्रकरण ! मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे यांच्यावर खंडणीचा FIR; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले ‘गहाण’ खत

Mantralaya Officers Transfer | ठाकरे सरकारचा सरकारी बाबूंना दणका ! तब्बल 103 अधिकाऱ्यांच्या बदल्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Silver Price Today gold rate hike by rs 320 and silver rate hike by rs 1010 in last two days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update