‘सोनं-चांदी’ झालं एवढ्या रूपयांनी ‘स्वस्त’, ‘या’ कारणामुळं झाली दरामध्ये ‘घसरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – देशांतर्गत बाजारात मागणी कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी झाल्याने दिल्ली सराफ बाजारात सोनं खरेदी करणं स्वस्त झाले आहे. सराफ बाजारात सोनं 222 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 60 रुपयांनी स्वस्त झाली. गुरुवार सोडून मागील तीन दिवसात सोन्याच्या किंमती घसरण होत आहे.

सोन्याचे दर –
दिल्ली सराफ बाजारात शुक्रवारी 99.9 टक्के शुद्ध सोनं 43,358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर गुरुवारी सोनं 43,513 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आंतरराष्ट्रीय सराफ बाजारात सोनं 1,632 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.25 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर –
सोन्या सह चांदीच्या दरात देखील घसरणं आली आहे. शुक्रवारी चांदी 60 रुपयांनी स्वस्त झाली, चांदी 48,130 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोटिडीज) तपन पटेल म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने सोन्यावर दबाव वाढला आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमतीत आणखी घट होण्याची शक्यता नाही.

पाकिस्तानात सोनं 81 हजार रुपये पार –
पाकिस्तानमधील वृत्तसंस्थानुसार पाकिस्तानच्या कराची शहरात शुक्रवारी 99.9 टक्के शुद्ध सोनं 80,976 पाकिस्तानी रुपये इतके होते, तर चांदी 874.50 पाकिस्तानी रुपये इतकी होती.