खुशखबर ! ‘सोन्या-चांदी’च्या किंमतीत मोठी ‘घसरणं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरणं पाहायला मिळत आहे. दिल्लीत सोन्याच्या किंमतीत 149 रुपयांनी घसरणं झाली. चांदीच्या किंमतीत देखील घसरणं पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी चांदी 473 रुपयांनी स्वस्त झाली. तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाच्या करारावर सहमती होत असल्याचे त्याचा शेअर बाजारावर देखील परिणाम दिसत आहे. लोकांकडून सोने खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरणं पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या किंमती –
शुक्रवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत घसरणं होऊन सोने 39,024 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर गुरुवारी दिल्लीत सोने 38,995 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. बुधवारी सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 225 रुपयांनी वाढून 38,715 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

चांदीच्या किंमती –
शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घसरणं पाहायला मिळाली. एक किलो चांदीचे दर 45,848 वरुन 45,375 रुपयांवर आले. तर गुरुवारी चांदीचे दर वाढले होते. त्यामुळे चांदी 45,726 रुपये झाली होती.

3 महिन्यात सर्वात जास्त स्वस्त झाले सोने –
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 3 महिन्याच्या कमी स्तरावर आल्या आहेत. त्यामुळे सोने 1445.7 डॉलर प्रति औंस झाले. तज्ज्ञांच्या मते अमेरिकी डॉलरमध्ये आलेल्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरणं आली आहे.

Visit : Policenama.com