मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहेत. मागील एक महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आज (बुधवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीतही घट झाल्याचं पाहायला मिळालं. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold) 46,980 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver) 64,700 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव यंदा कमी आहे. त्यामुळे बाजारात यंदा दिवाळीच्या सनादरम्यान सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान आजही सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एक सुवर्णसंधी आहे. मागील ट्रेडमध्ये मौल्यवान धातूची किंमत 47,030 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. त्यामध्ये घसरण होऊन 46,980 रुपये पर्यंत ट्रे़ड करत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. (Gold Silver Price Today)
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,510 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये
मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 46,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये
आजचा चांदीचा भाव – 64,700 रुपये
Pune Crime | पुण्यात हप्ता वसुली ! विमानतळ पोलिसांकडून गुंडावर मोठी कारवाई