Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Gold Silver Price Today | गेली पाच महिने सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे पाहता ग्राहकांनीही सोनं खेरदी करायला पंसती दर्शवली होती. पाच महिन्याच्या घसरणीनंतर आता सोन्या-चांदीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. आज (शनिवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold) 48,270 रुपये पर्यंत पोहचला आहे. तर चांदीची किंमत (Silver) 67,100 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

मागील काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाल्याचं दिसलं. मात्र, आता सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत. काल (शुक्रवारी) सोन्याचे दर 47,340 रुपये होते. त्यामध्ये वाढ होऊन सध्या 48,270 रुपये पर्यंत गेले आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव हा कमीच आहे. त्यामुळे ग्राहकांचीही सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे.

 

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

 

आजचा सोन्याचा भाव –

 

पुणे –

 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,480 रुपये

 

मुंबई –

 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,270 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,270 रुपये

 

नागपूर –

 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,270 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,270 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 67,100 रुपये ( प्रति किलो)

 

Web Title : Gold Silver Price Today | gold rate price today on 13 november 2021 forecast outlook silver price rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Avoid Cold-Cough | बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी ‘या’ वस्तूंचे करा सेवन, जाणून घ्या

Condom King | ’कंडोम किंग’ नावाने ‘हा’ व्यक्ती ‘फेमस’, लोकांना मोफत वाटतो ‘निरोध’! HIV विरूद्ध सुरू केलीय मोहिम

Dr. Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांनी उलगडले एकांतवासाचे गुपित, व्हिडिओ जारी करत म्हणाले… (व्हिडिओ)