Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमीच; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किंमतीत सातत्याने (Gold Silver Price Today) बदल होत असतात. दररोजच्या होणा-या बदलामध्ये या महिन्यात सोन्याच्या भावात अधिक प्रमाणात घट झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी होताना दिसत आहेत. दस-याच्या आगोदर सोन्याच्या किंमती उतरताना दिसल्या. मात्र दसरा कालावधीत काही प्रमाणात सोन्याचे दर वाढले. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,070 रुपये पर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 63,600 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे.
मागील काही आठवड्यापुर्वी सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) साधारण प्रमाणात घट होताना दिसल्या. दसरा शुभ मुहूर्तावर या कालावधीत सोन्याचा भाव मात्र काही प्रमाणात वाढताना दिसला. दरम्यान, मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. तर, आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं.
सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45,470 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,690 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47,070 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,070 रुपये
आजचा चांदीचा भाव – 63,600 रुपये प्रति किलो.
Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका