Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसत आहेत. दसरा कालावधीत वाढलेल्या किंमतीत पुन्हा घट होत आहे. आज (गुरुवारी) सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत मात्र वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,490 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत (Silver Price) 64,600 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

विजयादशमी दसरा सनादरम्यान सोन्याचे दर (Gold Silver Price Today) वधारले होते. मात्र, त्या कालावधीत दसरा शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारात प्रचंड गर्दी केली होती. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती उतरत आहेत. तर सध्या चांदीच्या किंमती वाढलेल्या दिसून येत आहेत. सोन्याच्या भावात दिवसेंदिवस घसरणीने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना ही एक योग्य वेळ आहे. गेल्या ट्रेडमध्ये 46,510 रुपये सोन्याची किंमत होती. सध्या कमी होऊन 46,490 रुपयापर्यंत पोहचली आहे. (Gold Silver Price Today)

Crime News | धक्कादायक ! महिला सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या, ‘त्या’ मेसेजने खळबळ

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.

आजचा सोन्याचा दर –  

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,870 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,490 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,490 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,490 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,490 रुपये

आजचा चांदीचा भाव –  (Silver Price) – 64,600 रुपये

हे देखील वाचा

Sanjay Raut | संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा’

Anti Corruption Bureau Latur | 2500 रुपयाची लाच घेताना वीजमंडळाचा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; लातूरच्या उदगीर तालुक्यात कारवाई

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Silver Price Today |gold rate price today on 21 october 2021 forecast outlook silver price rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update