Gold-Silver Price Today | सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today | मागील काही महिन्यापासून सातत्याने सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) चढ-उतार होताना दिसत आहेत. गेल्या काही आठवड्यामध्ये सोन्याच्या किंमतीत (Gold Price) वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मंगळवार, बुधवार अशा सलग दोन दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. याचप्रमाणे आज (गुरुवारी) देखील सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Price) मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 180 रुपयांनी कमी होऊन (प्रति 10 ग्रॅम) 46,480 रुपये पर्यंत पोहचला आहे. तर, चांदीच्या भावात (Silver Price) 20 रुपयाची घसरण होऊन सध्या दर 63,200 रुपये प्रति किलो आहे.

काय आहे सोन्याचा भाव? (Gold Price)

पुणे :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,490 रुपये

नागपूर :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,480 रुपये.
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये

नाशिक :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,770 रुपये.
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,370 रुपये.

मुंबई :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये.

दिल्ली :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,490 रुपये.

चांदीची किंमत – (Silver Price)

आजचा चांदीचा दर हा 63,200 रुपये प्रति 1 किलो आहे.

अशी ओळखा सोन्याची शुद्धता –

सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (Gold Price) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Web Title : Gold-Silver Price Today | gold rate price today on 26 august 2021 forecast outlook silver price rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona In India | भितीदायक ! गेल्या 24 तासात देशात कोरोनाची 46,164 नवी प्रकरणे; 607 जणांचा मृत्यू

Trojan Triada Virus | अलर्ट! गुगल प्ले स्टोअरवर बनावट WhatsApp, चुकूनही करू नका डाऊनलोड; अन्यथा…