Gold Silver Price Today | दिवाळीआधी खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसत आहेत. आज (शुक्रवारी) सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47.040 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत (Silver)  65.500 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे.

गेले काही दिवस सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य संधी आहे. दिवाळीसना आगोदर दागिन्यांच्या किंमती स्वस्त असल्याने बाजारात खरेदीची लयलूट होताना पाहायला मिळत आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झालेलं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव कमी झाला आहे.(Gold Silver Price Today)

दरम्यान, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यात 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचे सोन्याचे दर –

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर –  47.040 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर –  48.040रुपये

पुणे –

24 कॅरेट सोन्याचा दर –  46.220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर –  49.490 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर –  47.040 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर –  48.040 रुपये

आजचा सोन्याचा भाव – 65.500 रुपये प्रति किलो.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे मनपाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी महापौर दिल्लीत; मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Silver Price Today | gold rate price today on 29 october 2021 forecast outlook silver price rate today know more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update