Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहे. मागील एका आठवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील किरकोळ प्रमाणात घट होताना दिसत आहे. आजच्या घसरणीनंतर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,030 रुपये आहे. तर, चांदीची किंमत 60,450 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) नूसार सोन्याच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घट होत आहे. या घटत्या किंमतीमुळे ग्राहकांना सोनं खरेदीची सुवर्णसंधी आहे. दैनंदिन कमी होणाऱ्या किंमतीमुळे ग्राहकांना सोन्यात गुंतवणुक करण्याची चांगली वेळ आहे. दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या किंमतीत कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

दरम्यान, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

आजचे सोन्याचे दर – (Gold Price)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 44,470 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47,610 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,030 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,030 रुपये

आजचा चांदीचा भाव – 60,450 रुपये

Web Title :- Gold Silver Price Today | gold rate price today on 29 september 2021 forecast outlook silver price rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील बाणेर, वाकड, हिंजवडीत सर्वाधिक पसंती; जाणून घ्या कारण

Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

Pune Police | पोलिसांच्या इमारतीसाठी 3 महिन्यानंतर स्वतंत्र जलवाहिनी