Gold Silver Price Today : …म्हणून सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या 10 ग्रॅम Gold चे नवे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ दिसून आली. डॉलरच्या घटत्या मूल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, तर इकडे भारतातही सोन्याचे भाव वाढले आहेत. दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 161 रुपयांची वाढ झाली. सोबतच चांदीचे भाव एक किलोमागे 800 रुपयांनी वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते भारत चीन संबंध असेच ताणले गेले तर सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात सोन्याच्या किंमती 7 ऑगस्टला 56,200 वर पोहचल्या होत्या, जागतिक स्तरावर किंमतीच्या चढ-उतारानंतर भारतातील सोन्याच्या किंमती काहीशा अस्थिर झाल्या आहेत. ऑगस्ट मध्ये घरेलू बाजारात सोन्याच्या किंमती 4000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या घसरल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यांच्या नव्या उंचीवर पोहचल्या सोन्याच्या किंमती

जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती 2 आठवड्यांच्या नव्या उंचीवर पोहचल्या. सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकी फेडरल रिजर्वच्या नव्या संकेतानुसार येणाऱ्या काही दिवसांत व्याज दर काही दिवसांसाठी कमीच राहील.

सोन्याच्या नव्या किंमती

HDFC सिक्योरिटीज नुसार, सोमवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,477 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढून तो 52,638 रुपये इतका झाला. 10 ग्रॅम सोन्यामागे 161 रुपयांची वाढ झाली आहे. तर, मुंबईत 99.% शुद्ध सोन्याची किंमत 51,405 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती.

चांदीचे नवीन भाव

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीत देखील वाढ दिसून आली. दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीचा भाव 67,295 रुपायांवरून तो 68,095 वर पोहचला. दरम्यान चांदीच्या किंमतीत प्रति एक किलोग्रॅम मागे 800 रुपयांची वाढ झाली. मुंबईत मात्र चांदीचा भाव 66,516 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.