Gold Silver Price Today | ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सोन्या-चांदीचे दर उतरले; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | मागील आठवड्यापासून सातत्याने सोन्याच्या किंमती उतरु लागल्या आहेत. सलग पाच ते सहा दिवस सोन्याच्या दरात सतत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सप्टेंबर महिन्यात सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून आला. सलग कमी होणा-या सोन्याच्या किंमतीमुळे ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करायला योग्य संधी उपलब्ध झाली आहे. तसेच ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सोन्या-चांदीचे दर कमी होताना दिसत आहे. आज (शुक्रवारी) सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याच्या वायदे दरात 0.05 टक्क्यांनी घसरला आहे. आणि चांदीची किंमत (Silver Price) 0.19 टक्क्यांनी कमी झाली आहे.

आज (शुक्रवारी) सोन्याचा भाव (Gold Price) 46,497 रुपये प्रति तोळावर पोहचला आहे. त्याचबरोबर चांदीचा दर (Silver Price) 59,504 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. सोने रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 9700 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) वर सोन्याची किंमत 46,497 रुपये प्रति तोळा आहे. या दराच्या तुलनेत आज सोन्याचा भाव 9700 रुपयांनी कमी आहे. (Gold Silver Price Today)

 

असं तपासा सोन्याची शुद्धता –

‘BIS Care app’ च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.
या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहिती देखील मिळणार आहे.

मिस्ड कॉलद्वारे मिळेल सोन्याचा दर –
22 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल.
शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकणार आहे.

Web Title :- Gold Silver Price Today | gold rate today 1st october 2021 gold down and silver also fall on friday check latest rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण (व्हिडीओ)

LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…

Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार (व्हिडिओ)