Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर सोने 35 रुपयांनी किरकोळ वाढ झाली. आज सोन्याचा दर (Gold Price) 52,913 (24 कॅरेट) रुपये आहे.

 

चांदीच्या किमतीत देखील (Silver Price) वाढ झाली आहे. आज चांदीचा दर 162 रुपयांनी वाढला आहे.
चांदी 68 हजार 952 रुपयांवर व्यवहार करत आहे.
दरम्यान, सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 702 रुपयांवर उसळी घेत होता.
तसेच याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 45,183 रुपये होता.
18 कॅरेटचा सोन्याचा दर 40, 665 रुपयांवर पोहोचला आणि 16 कॅरेट सोन्याचा भाव 36,147 रुपयांवर पोहोचला आहे.
सराफा बाजारात 1 किलो चांदीचा भाव 70,540 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही.
तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.
सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या –
सोन्याचा दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल,
ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price 13 april 2022 gold price today silver up by 162 rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा