पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात. कधी सोन्याची किंमत वाढते तर कधी कमी होते. बुधवारी (16 एप्रिल) सोन्याच्या किमतीत बदल पाहायला मिळत आहे. चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, बुधवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,६५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,८४६ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९५,१९० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९५० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते. सोन्याची पारदर्शकता तपासता येते. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
आजचा सोन्याचा भाव
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८५,६९०
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९३,४८०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,६९०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,४८०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,६९०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,४८०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,६९०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,४८०