Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | जागतिक शेअर बाजारातील (Global Stock Market) सततच्या घसरणीने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा भाव आणखी मजबूत केला आहे. सोन्याच्या किंमतीत मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या चढउतारामुळे सध्या काहीसा लगाम लागला आहे. आज सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,050 रुपये आहे. तर चांदीची किंमत 61,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

ग्लोबल बाजारातून मिळालेल्या संकेतांनंतर सोमवारी भारतात सोन्याच्या किंमती (Gold Prices) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडियावर (Multi Commodity Exchange) आज सोन्या-चांदीचे दर स्थिर झाले आहेत. दरम्यान, मागील किंमतीच्या तुलनेत सध्या सोन्या चांदीचा भाव (Gold Silver Price Today) कमी आहे.

 

दरम्यान, ग्लोबल इक्विटी मार्केट्समध्ये (Global Equity Markets) तीव्र सेल-ऑफ दिसत आहे. त्यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा (Investors) कल वाढला आहे. याव्यतिरिक्त वाढीच्या मंदावलेल्या लक्षणांमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे जाण्यास प्रवृत्त झाले आहेत. विशेष म्हणजे सध्या लग्नसराई सुरू आहे. यामुळे सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढलेली असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सोन्याचा दर कमी असल्याने गुंतवणूकदारांना सोनं खरेदी करण्यासाठी योग्य संधी आहे.

 

आजचा सोन्या-चांदीचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,380 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,330 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,380 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,380 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,400 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price in maharashtra 23 may 2022 mumbai pune nagpur nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा