Gold Silver Price Today | दिवाळीनंतर सोने तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. आज सोन्या-चांदीच्या किंमतीत थोडा बदल झाला आहे. बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र, आज (गुरुवार) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किंमती वाढल्या आहेत.

आजचे सोन्या-चांदीचे दर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा 10 ग्रॅमचा दर 581 रुपये आहे.

प्रमुख शहरातील सोने आणि चांदीचे दर 

शहर सोने (22 कॅरेट) चांदी प्रति किलो

मुंबई 46,700 58,100
पुणे 46,730 58,100
नाशिक 46,730 58,100
नागपूर 46,730 58,100
दिल्ली 46,850 58,100
कोलकाता 46,700 58,100

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price today gold and silver price in on 3rd november 2022 gold rate and silver rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

Gautami Patil | सांगलीत झालेल्या घटनेनंतर गौतमी पाटीलनी पत्रकार परिषद घेत केला ‘हा’ मोठा खुलासा (VIDEO)