Gold Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज गुरूवारी पुन्हा घसरण नोंदली गेली. आज 24 कॅरेट शुद्धतेचे सोने (Gold price today 16 December 2021) 240 रुपये कमी होऊन 47,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर, 22 कॅरेट शुद्धतेचे सोने आज 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. (Gold Silver Price Today)

 

तसेच चांदीच्या किमतीत (Silver price today 16 December 2021) सुद्धा आज मोठी घसरण दिसून येत आहे. आज चांदी कालच्या तुलनेत 600 रुपयांनी घसरून 60,900 रुपयांवर आली आहे.

 

सर्वोच्च स्तरापासून जवळपास 7490 रुपयांनी स्वस्त

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याचा दर 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. जर आपण आजच्या सोन्याच्या दराची तुलना सर्वोच्च स्तराशी केली तर सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या किमतीपासून 7,490 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त (Gold Price Dipped) झाले आहे. (Gold Silver Price Today)

 

24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर

 दिल्ली

– दिल्लीत आज 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 51,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

– 22 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीत 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

 मुंबई

– आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 47,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे.

– 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर आर्थिक राजधानीत 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price today gold dipped and silver also down by 600 rupees on 16 dec 2021 check latest 22 carat gold rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा