Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीची (Gold Silver Price Today) गुंतवणूकदारांकडून चांगली मागणी असल्यामुळे काल (शुक्रवारी) फ्युचर्सने उसळी घेतली आहे. त्यानंतर सोन्याचा दर 11 डॉलरने वाढून 1849 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर, चांदीही 55 सेंटने वाढून 22.07 डॉलर प्रति औंस झाली. आज सोन्याचा भाव (Gold Price) 350 रुपयांनी वाढून (24 कॅरेट) 52,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. तसेच, चांदीचा दर (Silver Price) 1,100 रुपयांनी वाढून 63,300 रुपयांवर ट्रेड करत आहे.

 

लग्नसराईसाठी दागिन्यांची मागणी बाजारात वाढताना दिसत आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी लग्नसराई असल्याने सराफा बाजारातही गर्दी होताना दिसत आहे.

दरम्यान, आयएसओ (Indian Standards Organization) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट वर 999, 23 कॅरेट वर 958, 22 कॅरेट वर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकले जाते. कॅरेट जितके अधिक असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जातेय.

 

22 आणि 24 कॅरेट फरक तपासा –
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9 टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price updates today 21st may 2022 know latest rates of gold and silver

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा